Advertisement

सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स कोसळला

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी देशातील शेअर बाजारात (share market) घसरण कायम राहिली. सेन्सेक्स (sensex) २०८.४३ अंकांनी घसरत ४१,११५.३८ बंद झाला. तर निफ्टी (nifty) ६२.९५ अंकांनी घसरून १२,१०६.९० वर बंद झाला.

सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स कोसळला
SHARES

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी देशातील शेअर बाजारात (share market) घसरण कायम राहिली. सेन्सेक्स (sensex) २०८.४३ अंकांनी घसरत ४१,११५.३८  बंद झाला. तर निफ्टी (nifty) ६२.९५ अंकांनी घसरून १२,१०६.९० वर बंद झाला. ऊर्जा, वित्तीय, वाहन आणि उर्जा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. 

सेन्सेक्स (sensex) मध्ये ओएनजीसी (ongc) ने सर्वाधिक ५.१३ टक्क्यांची घसरण नोंदवली.  एनटीपीसी (ntpc)  ४.२७ टक्के, कोटक महिंद्रा बँक (kotak mahindra bank) आणि मारुती सुझुकी दोन टक्क्यांहून अधिक घसरले. तर एचडीएफसी, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक एक टक्क्याने वधारले. टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शेअर्सही एक टक्क्याने वधारले. 

बुधवारी सकाळी शेअर बाजार (share market) उघडल्यापासूनच विक्रीचा दबाव होता.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने विकासदराचा अंदाज कमी केल्याने गुंतवणूकदारांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सलग तीन दिवस गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे. तसंच तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांचे आर्थिक निकालदेखील फारसे उत्साहवर्धक नाहीत. धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर आयटी क्षेत्रांच्या शेअर्सने चांगली वाढ नोंदवली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक ०.२२ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.०३ टक्क्यांनी घसरला.



हेही वाचा -

एलआयसीच्या २३ योजना १ फेब्रुवारीपासून बंद

३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बँकांचा संप




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा