Advertisement

३ दिवसांत सेन्सेक्स तब्बल २१४९ ने कोसळला; शुक्रवारीही घसरण कायम

अारबीअायचा निर्णय अपेक्षेप्रमाणे न अाल्याने शेअर बाजारात घसरण वाढली. त्यानंतर सेन्सेक्सने अाणखी ५०० अंकांनी कोसळत एकूण ९०० अंकांची घट नोंदवली.

३ दिवसांत सेन्सेक्स तब्बल २१४९ ने कोसळला; शुक्रवारीही घसरण कायम
SHARES

देशातील शेअर बाजारांतील घसरण थांबता थांबेना. मागील सलग तीन दिवसांपासून सेन्सेक्स, निफ्टीने जोरदार अापटी खाल्ली अाहे. ३ दिवसांत सेन्सेक्स तब्बल २१४९ अंकांनी कोसळला अाहे. शुक्रवारी घसरणीनेच उघडलेल्या देशातील शेअर बाजारात दिवसभर घसरण कायम राहिली. अखेरच्या तासात तर सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला. अखेर त्यामध्ये थोडीसी सुधारणा होत. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ७९२ अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ३७६ वर बंद झाला. तर निफ्टीनेही ३०३ अंकांची मोठी घट नोंदवली.


अारबीअायकडून निराशा

शुक्रवारी दुपारी रिझर्व्ह बँकेने अाढावा पतधोरणात रेपो दरात काहीच बदल केला नाही. डाॅलरच्या तुलनेत घसरता रुपया सावरण्यासाठी अारबीअायकडून रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ होणं अपेक्षित होतं. मात्र, अारबीअायचा निर्णय अपेक्षेप्रमाणे न अाल्याने शेअर बाजारात घसरण वाढली. त्यानंतर सेन्सेक्सने अाणखी ५०० अंकांनी कोसळत एकूण ९०० अंकांची घट नोंदवली.

तेल कंपन्यांना फटका

तेल कंपन्यांच्या शेअर्सही कोसळल्याने सेन्सेक्स, निफ्टीने मोठी घट नोंदवली. गुरूवारी सरकारने तेल कंपन्यांना पेट्रोल, डिझेलवरील दर १ रुपयांनी कमी करण्यास सांगितलं अाहे. त्यामुळे या कंपन्यांचा नफा घटणार अाहे. त्याचा परिणाम तेल कंपन्यांच्या शेअर्सवर पडला. तेल कंपन्यांचे शेअर्स ४ वर्षांच्या नीचांकावर अाले अाहेत. शुक्रवारी  भारत पेट्रोलियम, इंडियन ऑयल, हिंदुस्तान पेट्रोलियम, ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर्स तब्बल २८ टक्क्यांपर्यंत कोसळले.



हेही वाचा -

सणासुदीच्या दिवसात कर्ज महागणार नाही; अारबीअायने ठेवले रेपो दर स्थिर 

८ रुपयांच्या इंधनदरवाढीवर ५ रुपयांचा उतारा, नवीन दर अाज रात्रीपासून लागू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा