Advertisement

शेअर बाजारात दाणादाण, सेन्सेक्समध्ये ८५० अंकांची घसरण


शेअर बाजारात दाणादाण, सेन्सेक्समध्ये ८५० अंकांची घसरण
SHARES

सलग चौथ्या दिवशी डाॅलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाल्याने देशांतर्गत शेअर बाजारात एकच दाणादाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८५८.८१ अंकांनी घसरून ३५,११६.८२ वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत देखील २६७.१ अंकांची घसरण होऊन निर्देशांक १०, ५९१.१५ वर आला आहे. या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.


का झाली घसरण?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने रुपयाची घसरण होत आहे. बुधवारी एका डॉलरची किंमत ७३.३ रुपये झाली होती. त्यात गुरूवारी पुन्हा घसरण होऊन डॉलरची किंमत ७३.६० रुपये झाली. याचा देशांतर्गत शेअर बाजाराला मोठा फटका बसला.


कितीचं नुकसान?

या घसरणीमुळे एका झटक्यात गुंतवणूकदारांचे ३, २१, ३३५.२ लाख कोटी रुपये बुडाले. दुपारी बीएसईवर नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांची मार्केट कॅप १, ४०, ५०, ०१५.८५ लाख कोटी रुपयांवर आली. बुधवारी हीच मार्केट कॅप १, ४३, ७१, ३५१.०५ लाख कोटी एवढी होती.



हेही वाचा-

सलग ५ व्या दिवशी अापटी; सेन्सेक्स ५३६ ने कोसळला

बँक ऑफ महाराष्ट्रच्या 51 शाखा होणार बंद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा