Advertisement

सलग ५ व्या दिवशी अापटी; सेन्सेक्स ५३६ ने कोसळला

मागील अाठवड्यात ४ सत्रांमध्ये सेन्सेक्स, निफ्टी अापटले होते. सोमवारी मिडकॅप अाणि स्माॅलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा मोठा दबाव राहिला.

सलग ५ व्या दिवशी अापटी; सेन्सेक्स ५३६ ने कोसळला
SHARES

देशातील शेअर बाजारांमधील घसरण चालूच असल्याचं सोमवारीही दिसून अालं. सोमवारी सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्स अाणि निफ्टी कोसळले. वित्तीय, रियल्टी, बँकिंग, तंत्रज्ञान अाणि हेल्थकेअर कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे सेन्सेक्स दिवसभरात ५९० अंकांनी तर निफ्टी १८० ने अापटला. त्यानंतर थोडीसी सुधारणा होत दिवसाअखेर सेन्सेक्स ५३६ अंकांनी घसरत ३६ हजार ३०५ वर बंद झाला. तर निफ्टीही १७५ अंकांची घट नोंदवत १० हजार ९६७ वर स्थिरावला.


जोरदार विक्री

मागील अाठवड्यात ४ सत्रांमध्ये सेन्सेक्स, निफ्टी अापटले होते. एक दिवस मुहर्रममुळे बाजार बंद होते. या अाठवड्यात सेन्सेक्स १२४९ अंकांनी कोसळला. कच्च्या तेलाचे दर वाढत असून रुपयाचीही घसरण चालू अाहे. शेअर बाजारांसाठी चांगले संकेत अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर विक्री करत अाहेत.


दिग्गज शेअर्स कोसळले 

सोमवारी मिडकॅप अाणि स्माॅलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा मोठा दबाव राहिला. मिडकॅप इंडेक्स २.४ टक्के तर स्माॅलकॅप इंडेक्स २.७ टक्के घसरला. दिग्गज शेअर्समध्ये इंडियाबुल्स हाऊसिंग, आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स अाणि भारती एयरटेलचे शेअर्स ४ ते ७.५ टक्के कोसळले. तर  टीसीएस, कोल इंडिया, इन्फोसिस, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज अाणि एनटीपीसी अादी शेअर्स वधारले.



हेही वाचा -

शेअर बाजारात त्सुनामी; सेन्सेक्स १५०० अंकांनी कोसळला




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा