अर्थसंकल्पानंतर घसरण सुरूच, सेन्सेक्स ६६५ अंकांनी कोसळला

केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला. अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराला मोठी अपेक्षा होती. त्यामुळे शुक्रवारी सेन्सेक्स, निफ्टी चांगले वधारूनच उघडले.

SHARE

शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर देशातील शेअर बाजारांनी नाराज व्यक्त केली आहे.  अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरणीने उघडलेला सेन्सेक्स त्यानंतर तब्बल ६६५ अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही दुपारपर्यंत २०५ अंकांची मोठी घसरण नोंदवली. 


अर्थसंकल्पावर नाराजी

केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला. अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराला मोठी अपेक्षा होती. त्यामुळे शुक्रवारी सेन्सेक्स, निफ्टी चांगले वधारूनच उघडले. त्यानंतरही शेअर बाजारातील तेजी कायम होती. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यावर शेअर बाजाराने निराशा व्यक्त करत आपटी खाल्ली. काही तासातच सेन्सेक्स ३०० अंकांनी कोसळून बंद झाला. 


घसरण कायम

शेअर बाजारातील ही घसरण सोमवारीही कायम राहिली. सेन्सेक्स ६६५ अंकांनी कोसळून ३८,८४८ वर आला. तर निफ्टीही २०५ अंकांनी कोसळून ११ हजार ६०५ पर्यंत आला. सेन्सेक्समधील ३० पैकी २५ तर निफ्टीतील ५० पैकी ४४ शेअर घसरल्याचं दिसून येत आहे. हीरो मोटोकॉर्प , मारुती , एल अँड टी, बजाज ऑटो, एम अँड एम , हिंदुस्तान यूनिलिव्हर , टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डीव्हीआर , एसबीआय आणि कोटक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. हेही वाचा -

पेट्रोल, डिझेल अडीच रुपयांनी महागले

जाणून घ्या कसा वाचेल तुमचा आयकर
संबंधित विषय
ताज्या बातम्या