शेअर बाजारात दुसऱ्यांदा लोअर सर्किट

कोरोनाचं संकट आणखी वाढण्याची चिन्ह दिसत असल्याने गुुुुुुुुुुुुंतवणूकदारांनी मोठी भिती आहे. भयभीत झालेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात विक्री केली.

शेअर बाजारात दुसऱ्यांदा लोअर सर्किट
SHARES

कोरोनामुळे जगभरासहीत भारतातील शेअर बाजारात त्सुनामी आली आहे. काही आठवड्यांपासून शेअर बाजारात रोज प्रचंड मोठी घसरण होत आहे. भारतीय शेअर बाजारात सोमवारीही भूकंप झाला. सोमवारी सेन्सेक्स उघडताच 2900 अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही तब्बल 800 अंकांची घसरण नोंदवली. त्यामुळे शेअर बाजारात लोअर सर्किट लावावे लागले. पाऊण तास बाजारातील ट्रेडिंग थांबवण्यात आलं.  

महाराष्ट्रसहीत देशभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाचं संकट आणखी वाढण्याची चिन्ह दिसत असल्याने गुुुुुुुुुुुुंतवणूकदारांनी मोठी भिती आहे. भयभीत झालेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात विक्री केली. या मोठ्या घसरणीत गुंतवणूकदारांंना तब्बल ८ लाख कोटींचा फटका बसला आहे. 

करोना व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात ३१ मार्च पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र तरीही देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्री करून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे बाजारात मोठी पडझड झाली आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा बाजाराला लोअर सर्किट लागले असून ट्रेडिंग थांबवण्यात आले आहे.

सोमवारी शेअर बाजारातील १५० हून शेअर्सने सार्वकालीन नीचांकी स्तर गाठला. निफ्टी स्मालकॅप ८.८ टक्क्यांनी घसरले. आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांनी जवळपास ८ लाख कोटी गमावले. मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल प्रचंड प्रमाणात घसरले आहे.हेही वाचा -

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, तर मुंबईत आणखी एकाचा मृत्यू

Coronavirus Updates:मुंबईतील पेट्रोल पंप केवळ 'इतके' तास सुरू राहणार
संबंधित विषय