Advertisement

सेन्सेक्समध्ये वाढ, निफ्टीत घसरण


सेन्सेक्समध्ये वाढ, निफ्टीत घसरण
SHARES

युरोपियन बाजारातील मजबुतीचा आधार भारतीय बाजाराला मिळाल्याने मुंबई शेअर बाजारात काही प्रमाणात वसुलीचे चित्र दिसले. दिवस अखेर सेन्सेक्समध्ये 30 अंकांची वाढ होऊन तो 30465 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी 2 अंकांनी घटून 9428 वर आला.

दिवसभरात बँकिंग, एफएमसीजी आणि पॉवर क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी आणि आयटी, ऑईल अँड गॅस, ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल्स इ. क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा कल होता. निफ्टी 50 मधील 32 शेअर्स घसरून तर 19 शेअर्स वधारून बंद झाले.

यापूर्वी चांगल्या पावसाचा अंदाज, जीएसटीची घोषणा यामुळे एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली होती. या तेजीमुळे 17 मे रोजी सेन्सेक्सने 30691 चा सर्वोत्तम दर गाठला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा