Advertisement

शेअर बाजारात रेकाॅर्डब्रेक उसळी, अर्थसंकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अर्थसंकल्पातील तरतुदींच्या घोषणेनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३१४.८४ अंकांनी म्हणजेच ५ टक्क्यांच्या वाढीसहीत ४८,६००.६१ वर बंद झाला.

शेअर बाजारात रेकाॅर्डब्रेक उसळी, अर्थसंकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील ९ वा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातील तरतुदींच्या घोषणेनंतर मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (sensex) २३१४.८४ अंकांनी म्हणजेच ५ टक्क्यांच्या वाढीसहीत ४८,६००.६१ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निर्देशांक निफ्टी इंडेक्स देखील ६९३ अंकांच्या उसळीसह ५.०९ टक्क्यांनी वधारून १४,३२८.०० वर बंद झाला. याआधी १९९७ साली अशा प्रकारची उसळी शेअर बाजारात दिसून आली होती. त्यावेळी सेन्सेक्स ६ टक्क्यांनी वाढून बंद झाला होता.  

बीएसईत दिवसभरात ३,१२९ शेअर्समध्ये प्रामुख्याने व्यवहार झाले. यापैकी १९४७ शेअर्स वधारले तर ९८१ शेअर्स घसरले. याचाच अर्थ बाजारातील ६२ टक्के शेअर्समध्ये वाढ झाली. यामुळे नोंदणीकृत कंपन्यांची मार्केट कॅप वाढून १९२.६२ लाख कोटी रुपयांवर गेली. शुक्रवारी हाच आकडा १८६.१३ वर हाेता. या वाढीमध्ये बँकिंगचे शेअर्स पुढे होते. निफ्टी बँक इंडेक्स ८.८१ च्या वाढीसह ३३,२५७ वर बंद झाला. बँकिंग इंडेक्समधील आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे.

हेही वाचा- पेट्रोल-डिझेल हजार रुपयांवर न्यायचंय का? संजय राऊतांचा टोला

वाहनांसाठीच्या स्क्रॅपेज पाॅलिसीमुळे आॅटो शेअर्समध्येही चांगली वाढ नोंदवण्यात आली. निफ्टी (nifty) आॅक्टो इंडेक्स ४.२३ टक्क्यांनी वाढून बंद झाला. गृह खरेदीदारांना परवडणाऱ्या घरांच्या खरेदीत मिळालेल्या सवलतीमुळे रियाल्टी इंडेक्स देखील उसळले आणि ६.३१ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. 

सरकारने विमा कंपन्यांमधील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवून ४९ वरून ७४ टक्के करण्याची घोषणा केली आहे. याआधी २०१६ मध्ये हीच मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्के करण्यात आली होती. या घोषणेमुळे न्यू इंडिया इन्श्योरन्स कंपनीचे शेअर्स ८३९४ टक्के, एचडीएफसी लाईफ चे शेअर्स ३.१४ टक्के, एसबीआय लाईफचे शेअर्स १.२० टक्के आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफचे इन्श्योरन्सचे शेअर्स १.९० टक्क्यांनी वाढून बंद झाले आहेत. 

हेही वाचा- Budget 2021: जुन्या गाड्या भंगारात निघणार, वाचा, सरकारची नवी पाॅलिसी आहे तरी काय?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा