Advertisement

सेन्सेक्सची तब्बल ११२८ अंकांची उसळी

मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीचा सपाटा लावला.सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ४५० अंकांची झेप घेतली.

सेन्सेक्सची तब्बल ११२८ अंकांची उसळी
SHARES

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी शेअर बाजारांनी मात्र चांगलीच उसळी घेतली आहे. सेन्सेक्स मंगळवारी तब्बल ११२८ अंकांच्या वाढीसह ५०,१३८.५८ वर बंद झाला. तर निफ्टीही ३३७ अंकांनी मोठी वाढ नोंदवत १४,८४५.१० वर स्थिरावला.  बंद झाला.

मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीचा सपाटा लावला.सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ४५० अंकांची झेप घेतली. आयटी, एफएमसीजी, मेटल आणि फार्मा कंपन्यांनी खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. 

गेल्या आठवड्यात चांगल्या शेअर्सची किंमत प्रचंड घसरणीमुळे खाली आली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार ते शेअर्स खरेदी करत आहेत. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल एप्रिलमध्ये येतील. हे निकाल चांगले येण्याची अपेक्षा आहे.  देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार बाजारात खरेदी करत आहेत. या सर्व कारणांमुळे शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. 

इन्फोसिस, एचडीएफसी, एचडीएफसी बँकेसह रिलायन्स समभागांसह धातू, बँकिंग आणि आयटीमध्ये जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्स, निफ्टी वधारून बंद झाले.  सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स वधारले. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४ टक्के वाढ झाली. ३१६२ शेअर्सपैकी १५५५ शेअर्समध्ये वाढ झाली. 



हेही वाचा -


  1. १ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, 'हे' आहे कारण

  1. १ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी शुल्क
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा