Advertisement

वाढदिवसादिवशी शंभर वर्षांच्या महिलेचं लसीकरण, लसीकरण केंद्रावर केक कापून वाढदिवस साजरा

लसीकरणादिवशीच आजीबाईंनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण केली. यावेळी लसीकरण केंद्रावरच कर्मचाऱ्यांसोबत आजींनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसादिवशी शंभर वर्षांच्या महिलेचं लसीकरण, लसीकरण केंद्रावर केक कापून वाढदिवस साजरा
(Image: KS Hosalikar Twitter)
SHARES

मुंबईत ज्येष्ठांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) कोरोना केंद्रामध्ये १०० वर्षांच्या महिलेला लस देण्यात आली. विशेष म्हणजे लसीकरणादिवशीच आजीबाईंनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण केली. यावेळी लसीकरण केंद्रावरच कर्मचाऱ्यांसोबत आजींनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अंधेरी येथील १०० वर्षे वयाच्या प्रभावती खेडकर त्यांच्या नातीसह लस घेण्यासाठी बीकेसीतील कोरोना केंद्रात गेल्या होत्या. आधारकार्डवर त्यांची जन्मतारीख ५ मार्च १९२१ अशी होती. शुक्रवारी त्यांना १०० वर्षे पूर्ण झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.  त्या केंद्रावरील आरोग्य अधिकाऱ्यांनी लगेच केक मागवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. खेडकर आणि त्यांच्या ७४ वर्षीय मुलाने एकत्रित लस घेतली.

खेडकर वर्षभरापासून घराबाहेर पडल्या नव्हत्या. परंतु गेल्याव र्षांपर्यंत त्या भजनी मंडळात जात होत्या. कार्यक्रमात सहभाग घेत होत्या. त्या स्वत: वर्तमानपत्र वाचतात, बातम्याही बघतात. त्यामुळे लस घेणे म्हणजे काय हे त्यांना समजवावे लागले नाही. या वयोगटातील व्यक्तींना अधिक धोका असल्याने आम्ही तिला लस दिली, असे त्यांची नात रूचिता हिने सांगितले.

पालिकेच्या माहीम प्रसूतिगृह आणि जगजीवन राम सेंट्रल रेल्वे रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात लसीकरण सुरू झाले आहे. तसेच प्लाटिनम रुग्णालय (मुलुंड), शांतिनिकेतन (घाटकोपर), रिद्धिविनायक मालाड येथेही सोमवारपासून लसीकरण सुरू होणार आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा