Advertisement

विद्यार्थिनीने वाचवला घारीचा जीव


विद्यार्थिनीने वाचवला घारीचा जीव
SHARES

परळ - येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीच्या वतीने गुरुवारी एका घारीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घारीला जीवदान देण्यामध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थिनीचे योगदान आहे.

चेंबुरच्या सेंट अॅथोंनि गर्ल्स हायस्कुलमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षांच्या श्रुती चव्हाण हिला बुधवारी शाळेत जात असताना रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत एक घार दिसली. श्रुतीने काही पादचाऱ्यांच्या मदतीने या घटनेची माहिती त्वरित प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी (पॉज) च्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन दिली. पॉजचे स्वयंसेवक तेथे पोहोचण्या आधी त्यांनी जसे मार्गदर्शन त्या चिमुरडीला केले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे तिने त्या घारीला कपडा अंगावर टाकून उचलले आणि एका पुठ्ठ्याच्या खोक्यात ठेवले. पॉजचे स्वयंसेवक तेथे पोहोचताच ती घार त्यांच्या ताब्यात दिली. पॉज सोसायटीच्या स्वयंसेवकानी त्या घारीवर प्रथम उपचार करुन पुढील उपचारासाठी परळ पूर्व येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात गुरुवारी दाखल केले असून त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा