हरिश्चंद्रगडावर अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुटका

कल्याणमधील मुरबाडजवळच्या हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्याचा ५०० मीटर्सचा सुळका उतरायला या ट्रेकर्सनी सुरुवात केली आहे. कोकणकड्याचा हा सुळका यशस्वीरित्या उतरल्यानंतर त्यांना आणखी एक ३०० मीटर्सचा सुळका उतरावा लागणार आहे.

SHARE

हरिश्चंद्रगडावर रविवारी रात्री कल्याणमधील २० ट्रेकर्सनी गड उतरण्यास सुरुवात केली आहे. रविवारी संध्याकाळी अंधार पडल्याने या ट्रेकर्सना गड उतरण्यास मार्ग सापडत नव्हता. परंतु, सोमवारी सकाळी इतर ट्रेकर्स आणि प्रशासनाने बचाव मोहिमेला सुरु केली असून अडकलेल्या २० ट्रेकर्सनं गड उतरण्यास सुरुवात केली आहे.


आणखी ७ ते ८ तास

कल्याणमधील मुरबाडजवळच्या हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्याचा ५०० मीटर्सचा सुळका उतरायला या ट्रेकर्सनी सुरुवात केली आहे. कोकणकड्याचा हा सुळका यशस्वीरित्या उतरल्यानंतर त्यांना आणखी एक ३०० मीटर्सचा सुळका उतरावा लागणार आहे. त्यानंतर ट्रेकर्सना अंदाजे ३ तास पायी चालत जाऊन आपल्या बेस कँपला पोहोचता येणार आहे. त्याला किमान ७ ते ८ तासांचा कालावधी लागण्याची शक्याता आहे.


मार्ग सापडण्यास अडचण

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी २० जणांसोबत हरिश्चंद्रगड इथं ट्रेकिंगसाठी गेले होते. तिथून पुढे दीड किलोमीटरवर कोकणकडापासून ८०० फूट खाली हे सर्व ट्रेकर अडकले होते. त्यांच्यासोबत ५ महिला व १७ पुरुष आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नव्हता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलिसांना याबाबत कळवून ट्रेकर्सची सुटका करण्याचे निर्देश दिले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या