Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ पाहता देशातील अनेक शहरांत शंभरी गाठली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ
SHARES

मागील काही दिवसांपासून इंधन दरात सातत्यानं वाढ होताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ पाहता देशातील अनेक शहरांत शंभरी गाठली आहे. मागील आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. शिवाय, दररोज ३० पैशांची वाढ झाली आहे. रविवारी आणि सोमवारी किंमती थोड्या स्थिरावल्या असल्यामुळं ग्राहकांना दिलासा होता. मात्र, मंगळवारी पुन्हा इंधन दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं. राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ झाली आहे.

तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. त्यानुसार, गेल्या १२ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर, हनुमागड ते मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये किरकोळ पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांच्यावर गेले आहेत.

मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९०.९३ वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९७.३४ रुपये आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचे दर ९१.१२ रुपये प्रति लिटर आहेत. तर डिझेलची ८४.२४ रुपये प्रति लिटर दरानं विक्री केली जात आहे. मुंबईत डिझेलचे दर ८८.४४ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोलचे दर

नवी दिल्ली : ९०.९३ रुपये प्रति लिटर

मुंबई : ९७.३४ रुपये प्रति लिटर

कोलकाता : ९१.१२ रुपये प्रति लिटर

चेन्नई : ९२.९० रुपये प्रति लिटर

नोएडा : ८९.१९ रुपये प्रति लिटर

डिझेलचे दर

नवी दिल्ली : ८१.३२ रुपये प्रति लिटर

मुंबई : ८८.४४ रुपये प्रति लिटर

कोलकाता : ८४.२० रुपये प्रति लिटर

चेन्नई : ८६.३१ रुपये प्रति लिटर

नोएडा : ८१.७६ रुपये प्रति लिटर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा