अरुणाभ कुमारवर लैंगिक शोषणाचा आरोप

 Mumbai
अरुणाभ कुमारवर लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई - युट्युबवर आपल्या व्हिडिओने खळबळ उडवणाऱ्या टीवीएफचा मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणाभ कुमार आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. अरूणाभ कुमारवर लैंगिक शोषणाचा आरोप एका महिला कर्मचारीने केला आहे. सोमवारी या पीडित महिलेने ब्लॉग लिहिला आणि यामध्ये आपलं गेल्या 2 वर्षांपासून लैंगिक शोषण होतं असल्याचं म्हटलं आहे. आपण गेल्या 2 वर्षांपासून अरुणाभ कुमारच्या त्रासाला कंटाळल्याचं या महिलेने सांगितले. दरम्यान टीवीएफने या आरोपाचे खंडण केलं अाहे. अरुणाभ कुमारने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आरोपाचं खंडण करत आरोप करणाऱ्या पीडित महिलेला पोलिसांत तक्रार करायला सांगितली. 

                                                                             (Video Credit - National Biography Channel, YouTube)

Loading Comments 

Related News from समाज