SHARE

भारताच्या रक्षणासाठी सीमेवर लढा देणाऱ्या जवानांच्या सन्मानासाठी अथर्व फाऊंडेशनतर्फे 'वन फॉर ऑल, ऑल फॉर वन' मोहीम राबवण्यात येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासमवेत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

३१ जानेवारीला आम्ही सर्व मिळून जवानांना मानवंदना देणार आहोत. यासाठी १० जवानांच्या शौर्यगाथा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. विशेष म्हणजे, या कथा सेलिब्रिटि स्वत: वाचून दाखवणार आहेत. त्याव्यतिरिक्त आम्ही या जवानांचं गाव, त्यांचे कुटुंबीय यांची एक व्हिडिओ क्लिपही दाखवणार आहोत.

सुनील राणे, अध्यक्ष, अथर्व फाऊंडेशन

दरम्यान, खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अथर्व फाऊंडेशनच्या या संकल्पनेचं कौतुक केलं आहे. "आपले लष्करी जवान सीमेवर लढतात म्हणून आपण इथे आनंदात आणि सुरक्षित राहू शकतो. आपण त्यांच्या या कामगिरीचा सन्मान करायलाच हवा," असं हेमा मालिनी यावेळी म्हणाल्या.

मी ज्या सैनिकांच्या कथा ऐकल्या, त्या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या होत्य. यातल्या एखाद्या कथेवर जर मला सिनेमा बनवता आला, तर त्याचा आनंद होईल.

मधुर भांडारकर, दिग्दर्शक

३० जानेवारी रोजी जागतिक हुतात्मा दिन असून ३१ जानेवारी रोजी वरळीच्या एनएससीआयला हा कार्यक्रम होणार आहे. 'मुंबई लाइव्ह' या मोहिमेचे 'डिजीटल मीडिया पार्टनर' आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ