Advertisement

बीडीडी चाळकऱ्यांची यंदा शेवटची दिवाळी


बीडीडी चाळकऱ्यांची यंदा शेवटची दिवाळी
SHARES
Advertisement

शाळेला सुट्टी, नवीन कपडे, घरात बनवलेले तिखट गोड पदार्थ, घराला सजावट, रोषणाई आणि गावी जाण्याचा मुहूर्त या कारणांमुळे दिवाळी हा सर्वांच्याच आवडीचा सण. वर्षातून एकदा येणारा हा सण प्रत्येकालाच आपलंसं करून जातो. याहीपेक्षा चाळीतील दिवाळीची मजा काही औरच असते. चाळीत एका मजल्यावर 10-20 घरे नेहमी एकमेकांच्या आनंद आणि दुःखात सहभागी होणारी माणसं यामुळे इथे दिवाळी साजरी करण्याची पद्धत वेगळीच असते. त्यापैकीच एक लोअर परळ येथील बीडीडी चाळ. ही आपण सर्वांनाच परिचित असेल. 


परळमधील बीडीडी चाळीचे होणार पुनर्वसन

ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या या चाळीचे पुनर्वसन होणार आहे. त्यामुळे आता तेथील लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. येथील राहिवाशांना नवीन इमारत बांधून मिळणार आहे. याचा आनंद या रहिवाशांना होतच आहे, पण इथल्या रहिवाशांना ही चाळ सोडून जाण्याची इच्छा नाही. कारण इथे लहानपणापासून दिवाळीच नाही तर प्रत्येक सण अगदी जात-धर्म न पाळता एकत्रित साजरी करतो. येथे दिवाळी आली की रांगोळी, डेकोरेशन अशा अनेक स्पर्धा देखील ठेवतात. हे क्षण भविष्यात मिळणे कठीण होणार आहे, अशी खंत इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली. 

त्यामुळे या बीडीडी चाळीतील राहिवाशांनी इथली शेवटची दिवाळी अगदी थाटामाटात आणि एकमेकांच्या हातात हात घालून उत्साहात साजरी केली. 


आता दिवाळी कशी साजरी करायची?

या चाळीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एका मजल्यावर 20 खोल्या आणि त्यातील ऋणानुबंध पहिला तर तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. दिवाळी आली की फराळ बनवण्यापासून ते रांगोळी काढण्यापर्यंत इथले शेजारी एकमेकांना मदत करतात. दिवाळीच काय तर तो कोणताही सणो असो ती अगदी सर्वांनी मिळून साजरी करण्याची जणू इथल्या रहिवाशांची परंपराच आहे. पण आता याच चाळीतील कुटुंबाचे पुनर्वसन होणार असल्यामुळे ते विभक्त होणार आहेत. ही चाळ नष्ट होऊन येथे उंच इमारती बांधल्या जाणार असल्यामुळे कुठेतरी हे दिवस पुसणार, असे दुःख इथल्या रहिवाशांनी व्यक्त केले.

या चाळी तोडून नवीन इमारती बांधणार असल्यामुळे आता येथील संस्कृती ही पूर्णपणे बदलणार आहे. इथे फ्लॅट पद्धतीचे घरे येणार. त्यामुळे नेहमी एकमेकांच्या घरात जाणारे आता या फ्लॅटमध्ये अडकून राहतील, मग दिवाळी असो वा इतर सण यापुढे एकत्रित साजरा करता येणार नाही अशी भीती इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली. 


हेही वाचा - 

560 रहिवाशांची बीडीडीत यंदा शेवटची दिवाळी!


संबंधित विषय
Advertisement