Advertisement

बेस्ट सवलतीचं ओळखपत्र


बेस्ट सवलतीचं ओळखपत्र
SHARES

दादर - महापौर निवास आवारात गुरुवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना बेस्ट सवलतीच्या ओळखपत्राचं वितरण करण्यात आलं. या वेळी महापौर स्नेहल आंबेकर, बेस्टचे व्यवस्थापक रविकांत देशपांडे, बेस्ट समितीचे सदस्य श्रीकांत कवठणकर, तसंच मनसेचे गटनेते आणि नगरसेवक संदीप देशपांडे उपस्थित होते.
या वेळी देशपांडे म्हणाले की, दिवाळीच्या मुहूर्तावर महापालिकेने आणलेली ही योजना दिव्यांगांसाठी एक दिवाळी भेटच आहे. महालिकेच्या संपूर्ण बजेटच्या 3 टक्के दिव्यांगांसाठी असल्यामुळे लंडनमध्ये दिव्यांगांसाठी ज्या विशेष सोयी आहेत, त्या मिळतील आणि दिव्यांगांना सहज वावरता येईल. हे कार्ड सोमवारपासून सुरू होईल. यासाठी प्रथम 40 रुपये भरावे लागणार आहेत. दिव्यांगांच्या स्टॉलवर अजूनही वेगवेगळ्या वस्तू विकण्याची त्यांना परवानगी मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या. या वेळी सर्व दिव्यांगांना तुळशीचं रोप आणि ओळखपत्र देण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा