'मनाची श्रीमंती' दाखवा

परळ - जुने कपडे किंवा उपयोगात नसलेल्या वस्तूचं तुम्ही काय करता ? टाकून देता? की भंगारवाल्याला विकता?... पण हे कपडे जर गरजू आणि गरीबांना दिले तर? ते किती खूश होतील ना?... हाच विचार करून पालिकेच्या एफ दक्षिण विभागानं मनाची श्रीमंती हा उपक्रम राबवलाय. सहायक आयुक्त विश्वास मोटे यांची संकल्पना. नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम सुरू राहिल. मग ज्यांना त्यांची गरज आहे त्यांना वस्तू आणि कपडे दिले जातील.

Loading Comments