Advertisement

पुरामुळे मुंबईला होणारा गोकूळचा दूध पुरवठा उद्या बंद

कोल्हापूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे.

पुरामुळे मुंबईला होणारा गोकूळचा दूध पुरवठा उद्या बंद
SHARES

कोल्हापूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी शनिवारी मुंबईला होणारा गोकूळचा दूध पुरवठा बंद राहणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. 76 हजार लिटर दूध संकलन घटलं आहे. तर शुक्रवारी तब्बल दहा ते अकरा लाख लिटर संकलन घटण्याचा अंदाज आहे. पुरामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते बंद असल्यामुळे गोकुळच्या दूध संकलनावर मोठा परिणाम झाला असल्याची माहिती गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली आहे. 

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापुरात पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात अनेक भागात पुराचं पाणी, मुंबई- बंगळुरू महामार्ग बंद करण्यात आला आहे. 

एनडीआरएफची आणखी एक तुकडी कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. गुरूवारी एनडीआरएफच्या दोन टीम कोल्हापुरात आल्या आहेत. वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा