• भिंत माणुसकीची !
SHARE

मुलुंड - माणुसकीची भिंत ही संकल्पना तशी नवी राहिलेली नाही. या संकल्पनेचा वाढता प्रभाव प्रत्येक शहरात दिसतोय. मुंबईसह उपनगरातही माणुसकीची भिंत उभारण्यात आलीये. मुलुंड पूर्वेस रंगकौशल्य कटट्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात आलाय. या उपक्रमात गरीबांसाठी कपडे, जीवनाश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

परिसरातील काही स्थानिकांनी एकत्र येऊन हा कट्टा तयार केलाय. गरज नसलेल्या वस्तू या भिंतीवर आणून ठेवायच्या आणि गरज आहे त्यांनी त्या घेऊन जायच्या, अशी ही संकल्पना. इथे अनेकांनी वापरात नसलेले कपडे, खुर्च्या, सायकल, खेळणी अशा वस्तू ठेवल्या आहेत. स्थानिकांच्या या माणुसकीच्या भिंतीमुळे समाजात आजही माणुसकी शिल्लक आहे, याचाही प्रत्यय मिळतोय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या