Advertisement

राज्यात सुरू होणार तुरुंग पर्यटन, २६ जानेवारीला उद्घाटन

प्रत्यक्षात तुरूंग बघायचा असेल तर तशी सोय आतापर्यंत नव्हती. मात्र, राज्य सरकारने तुरूंग पर्यटन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सुरू होणार तुरुंग पर्यटन, २६ जानेवारीला उद्घाटन
SHARES

राज्यात आता तुरुंग पर्यटन सुरू होणार आहे. प्रत्यक्षात तुरूंग बघायचा असेल तर तशी सोय आतापर्यंत नव्हती. मात्र, राज्य सरकारने तुरूंग पर्यटन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारी २०२१ पासून तुरूंग पर्यटन सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुरूंग पर्यटन योजनाचं उद्घाटन करणार आहेत. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत तुरूंग पर्यटनाची माहिती दिली. राज्यात ६० तुरूंगात २४ हजार कैदी आहेत. ३ हजार कैदी तात्पुरत्या तुरूंगात आहेत. जेल पर्यटनाची सुरूवात आम्ही करत आहोत. त्याला विद्यार्थी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. २६ जानेवारीपासून याची सुरूवात केली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे यांचं उद्घाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपण स्वतः गोंदियातून या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

देशमुख यांनी सांगितलं की, तुरूंगात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचं ठिकाण नागरिकांना बघता येणार आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबंडेकर यांच्यामध्ये जिथे पुणे करार झाला, ती जागा व्यवस्थित आहे. ज्या बराकीमध्ये महात्मा गांधींना ठेवलं होतं. तोही व्यवस्थित आहे.

मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ठेवण्यात आलेले सेल आहेत. ते विद्यार्थ्यांना, नागरिकांना बघता येणार आहे. त्यानिमित्ताने इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांनाही याचा फायदा होईल. येरवडा जेलपासून याची सुरूवात झाल्यानंतर राज्यातील इतर तुरूंगात पर्यटन योजना सुरू केली जाईल.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा