Advertisement

युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांचेही भारताने वाचवले प्राण

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसोबत पाकिस्तानी विद्यार्थांनाही बाहेर काढलं आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांचेही भारताने वाचवले प्राण
SHARES

रशिया आणि युक्रेनच्या युद्धा दरम्यान भारतानं माणुसकिचे दर्शन घडवलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसोबत पाकिस्तानी विद्यार्थांनाही बाहेर काढलं आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मराठी मुलांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या प्रवासात काही पाकिस्तानी विद्यार्थी देखील आहे. आता या पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी भारताचे आभार मानले आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांसोबत बसमध्ये असणारा पाकिस्तानी विद्यार्थी मोहम्मद सकलेन म्हणाला, युक्रेनमधील भारतीय कंत्राटदारांचे आम्ही आभार मानतो. आम्हाला इथून बाहेर काढण्यास त्यांनी मदत केली आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, पाकिस्तानी विद्यार्थी कमी आहेत.

आम्हाला आमच्या दूतवासानं एका ठिकाणावर पोहचण्यास सांगितलं आहे. ज्या शहरात मी राहतो ते शहर अंडर अटॅक असल्यामुळे इथं वाहतुकीची साधनं पोहचणं शक्य नाही. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला एअरलिफ्ट करण्यास मदत करू, अशी माहिती आमच्या दुतवासाकडून देण्यात आल्याचं देखील मोहम्मद या वेळी म्हणाला.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्या अंतर्गत आज सातवं विमान रोमानियाच्या बुखारेस्ट शहरातून मुंबईत दाखल झालं.

१८२ भारतीय विद्यार्थी या विमानातून देशात परतले आहेत. या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. मायदेशी परतताच विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. तर आपल्या लेकरांना पाहून पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही विद्यार्थ्यांनी मुंबई विमानतळावरच तिरंगा फडकवला.



हेही वाचा

रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

रशिया-युक्रेन युद्ध: १८२ भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विमान मुंबईत दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा