Advertisement

रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली.

रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
SHARES

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या सहाव्या दिवशी खार्किव शहरात नवीन या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली.

विदेश मंत्रालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे की,''आज सकाळी खार्किवमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. याचं आम्हाला दु:ख आहे. मंत्रालय त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. आम्ही कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो.''

परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी नवीन शेखराप्पाच्या घरी पोहोचले असून त्यांनी नवीनचे प्रेत हे शवगृहात पाठवल्याची माहिती त्यांना दिली आहे. असं असलं तरी नवीनचे प्रेत हे भारतात आणणे शक्य आहे याची शाश्वती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी नवीन हा कर्नाटकचा रहिवासी होता. तो २१ वर्षांचा होता आणि जेवण घेण्यासाठी बाहेर गेला होता. तो युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता.

दरम्यान यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच्या वडिलांना फोन केल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.

बागची म्हणाले- युक्रेनमधील भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांच्या संपर्कात आहेत. नागरिकांचे त्वरित आणि सुरक्षित परतणे हे आमचे प्राधान्य आहे. रशिया आणि युक्रेनमधील आमचे राजदूत तेच करत आहेत.

रशियानं युक्रेनविरोधातील युद्धात प्रतिबंधित केलेल्या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा आरोप युक्रेननं केला आहे. युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत ओकसाना मार्कारोव्हा यांनी हा दावा केला. व्हॅक्युम बॉम्ब सह इतरही प्रतिबंधित शस्त्रांचा वापर रशिया करत असल्याचा युक्रेनमधील मानवी हक्क संघटनांचा आणि युक्रेन सैन्याचा दावा आहे.

रशियानं कीव्ह, खार्किव आणि चेर्निहाइव्हमध्ये तोळफखाना (तोफांनी) हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनमधील भारतीय दूतावासानं सर्व भारतीय नागरिकांना तात्काळ कीव्ह सोडण्यास सांगितलं आहे. दूतावासानं जारी केलेल्या आपत्कालीन सल्लागारात असे म्हटले आहे की, भारतीयांनी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्वरित शहर सोडावे.



हेही वाचा

मुंब्रातील २ विद्यार्थी युक्रेन-रोमानियन सीमेवर अडकून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा