याला म्हणतात जिद्द!

गिरगाव - मागील 25 वर्षांपासून सीता वेटाल (40) या गिरगावमधील फुटपाथवर चर्मकाराचं काम करत आहेत. चेहऱ्यावर आनंद कायम राखत सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत त्या चपला शिवतात. हे काम करताना त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही. उलट गर्व वाटत असल्याची प्रतिक्रिया सीता यांनी दिली. सीता यांचे वडील देखील चर्मकार होते. भाऊ दिव्यांग असल्याने सीता यांनी वडिलांना साथ दिली. सीताचे पती हे ड्रायव्हर आहेत. ते देखील सीता यांच्या या कामात प्रोत्साहन देतात. त्यांची मुलंही तिला या कामात हातभार लावत असतात.

Loading Comments