Advertisement

पुरुषांच्या बरोबरीत असूनही महिलांना पगार कमी


पुरुषांच्या बरोबरीत असूनही महिलांना पगार कमी
SHARES

भारतात एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के महिला आहेत. 2011 मधील जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 18.1 कोटीवरून 1.21 अब्ज एवढी झाली आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात पुरुषांची संख्या 62.37 कोटी असून महिलांची संख्या 58.64 कोटी इतकी आहे. पण पुरुषांच्या तुलनेत महिलांची कमाई खूपच कमी आहे.

भारतात 44.42 कोटी पुरुष तर 33.42 कोटी महिला सुशिक्षित आहेत. जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) ने गुरुवारी सादर केलेल्या एक अहवालानुसार स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत भारताची घसरण झाली आहे. यापूर्वी स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत भारत 21 व्या स्थानावर होता. आता तो 108 व्या स्थानावर आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, याबाबतीत चीन आणि बांग्लादेश भारतापेक्षा खूप पुढे आहेत. या अहवालानुसार बांग्लादेश 47 तर चीन 100 व्या क्रमांकार आहे.

या अहवालात नमुद केले आहे की, पुरुषांप्रमाणे एकसारखे श्रम केल्यानंतरही महिला कर्मचाऱ्यांना 60 टक्के वेतन मिळते. देशात फक्त 13 टक्के महिलाच वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. पुरुषांचे वार्षिक दरडोई उत्पन्न 13.56 लाख रुपये आहे, तर महिलांचे वार्षिक दरडोई उत्पन्न 7.74 रुपये एवढे आहे.


राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग

भारतात पुरुष आणि महिलांच्या वेतनात समानता नसली तरी राजकीय क्षेत्रात मात्र महिलांचा दबदबा वाढत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असून याबाबतीत भारत 20 व्या स्थानावर आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा