Advertisement

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या सभेला परवानगी नाकारली

महाराष्ट्र बंदच्या तोडफोड आणि जाळपोळीनंतर ४ जानेवारी रोजी मुंबईतील विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये राष्ट्रीय छात्र संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनाला जिग्नेश मेवाणी, उमर खालिद, ऋचा सिंग, देबाब्रत गोगई, प्रदीप नरवाल हे विद्यार्थी नेते उपस्थित राहणार होते.

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या सभेला परवानगी नाकारली
SHARES

शुक्रवारी छात्रभारतीच्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला अचानक मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, मुंबईत ही सभा होणाराच असा दृढ निश्चय छात्रभारतीच्या शेकडो विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांनी केला असून या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याचा दावाही छात्रभारतीच्या वतीनं करण्यात आला आहे. 



देशभरातून विद्यार्थी 

महाराष्ट्र बंदच्या तोडफोड आणि जाळपोळीनंतर ४ जानेवारी रोजी मुंबईतील विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये राष्ट्रीय छात्र संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी, विद्यार्थी नेते, छात्र भारतीचे पदाधिकारी सहभागी राहणार होते. या संमेलनाला जिग्नेश मेवाणी, उमर खालिद, ऋचा सिंग, देबाब्रत गोगई, प्रदीप नरवाल हे विद्यार्थी नेते उपस्थित राहणार होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात जिग्नेश मेवाणी व उमर खालिद बोलणार असून चार महिन्यांपूर्वी भाईदास हॉलमध्ये राष्ट्रीय छात्र संमेलनाबाबत पोलिस परवानगी व इतर संपूर्ण तयारी करण्यात आली होती.


विद्यार्थी, पदाधिकाऱ्यांना ताब्यात

मात्र सकाळच्या सुमारास अचानक या संमेलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी येण्यापासून अटकाव करण्यात आलं. तसेच पोलिसांच्यावतीनं छात्र भारतीच्या शेकडो विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. संमेलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये छावणीचं स्वरूप अालं आहे. 


या संमेलनाला पुर्व परवानगी घेतली असतानाही अचानक सरकारच्या आदेशानं काही तासांपूर्वी आयोजक म्हणून मला नोटीस देण्यात आली. मुंबई पोलिसांनी दडपशाही करत छात्रभारतीच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. परंतु यावर हार न मानता पोलिसांच्या समोरच हे संमेलन भरवलं. डफावर थाप देत, विवेकाचा आवाज बुलंद करूया अशी घोषणाबाजी करत पोलिसांची दडपशाही हाणून पाडली. 

 - सचिन बन्सोड, छात्रभारती, मुंबई अध्यक्ष



हेही वाचा -  

सोमवारी रात्रीपासून ३० हजार बेस्ट कर्मचारी संपावर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा