Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या दरात फारसे बदल नाही


पेट्रोल-डिझेलच्या दरात फारसे बदल नाही
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये  सातत्यानं वाढ होत आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पार गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढ झाली. दररोज ३० पैशांपर्यंत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारीही इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली पण  बुधवारी मात्र दरांमध्ये फारसे बदल झाले नाहीत.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत ३५ पैशांची वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीही ३५ पैशांनी वाढल्या. खरंकर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९०.९३ वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९७.३४ रुपये आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

पेट्रोलचे दर

  • नवी दिल्ली : ९०.९३ रुपये प्रति लिटर
  • मुंबई : ९७.३४ रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : ९१.१२ रुपये प्रति लिटर
  • चेन्नई : ९२.९० रुपये प्रति लिटर
  • नोएडा : ८९.१९ रुपये प्रति लिटर

डिझेलचे भाव

  • नवी दिल्ली : ८१.३२ रुपये प्रति लिटर
  • मुंबई : ८८.४४ रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : ८४.२० रुपये प्रति लिटर
  • चेन्नई : ८६.३१ रुपये प्रति लिटर
  • नोएडा : ८१.७६ रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा