Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या दरात विक्रमी वाढ; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

दिवसेदिवस वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळं सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात विक्रमी वाढ; सर्वसामान्यांना आर्थिक फटका
SHARES

दिवसेदिवस वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळं सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. देशात सलग सातव्या दिवशी किमती वाढली आहे. सद्यस्थितीत मुंबईत पेट्रोलचे भाव ११०.४१ रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल आता १०१.०३ रुपये प्रति लीटर मिळत आहे.

रविवारी पेट्रोलच्या दरात ३० पैशांनी प्रतिलिटर आणि डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ केली आहे. पेट्रोलही ३० पैसे प्रति लिटर महाग झाले आहे.

दरवाढीनंतर, दिल्लीत पेट्रोलची किंमत १०४.४४ प्रति लीटरच्या नवीन उच्चतम पातळीवर पोहोचली आहे. दिल्लीत डिझेलची किंमत ९३.१७ रुपये प्रति लीटर आहे. केंद्रीय कर वगळता, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्य कर कारणांमुळं राज्यानुसार बदलतात.

कोलकातामध्ये पेट्रोल १०५.०५ रुपये प्रति लीटर झाले आहे, तर डिझेल ९६.२४ रुपयांनी विकले जात आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.७६ रुपये आणि डिझेल ९७.५६ रुपयांनी विकले जात आहे. सलग ४ दिवस पेट्रोलच्या दरात ३० पैशांनी आणि डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. या महिन्यात, सोमवार, ४ ऑक्टोबर वगळल्यास या इंधनांच्या किमती दररोज वाढल्या आहेत. म्हणूनच या महिन्याच्या केवळ १० दिवसात पेट्रोल २.८० रुपयांनी तर डिझेल ३.३० रुपयांनी महाग झाले आहे.हेही वाचा -

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा