दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव रस्त्यावर

 Mumbai
दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव रस्त्यावर

मस्जिद- पाकिस्तानमधील शाहबाज कलंदर येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध मुंबईमधील मस्जिद येथे सुन्नी मुस्लिम बांधवांनी केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. यावेळी हाफिज सईद या अतिरेक्याचे छायाचित्र देखील जाळण्यात आले. तसेच वहाबी सलबी या दहशतवादी आयएसआयविरुद्ध त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पाकिस्तानने अशा दहशतवादाविरूद्ध एकजूट होऊन लढा दिला पाहिजे असा संदेश पोष्टरद्वारे त्यांनी दिला. रझा अॅकॅडमीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात 50 हून अधिक मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता. यावेळी रझा अॅकॅडमीचे जनरल सेक्रेटरी सईद नुरी देखील उपस्थित होते.

Loading Comments 

Related News from समाज