Advertisement

रिलायन्स जिओची ग्राहकांना २ दिवस मोफत सेवा

एका दिवसात ८ तास सेवा ठप्प झाल्यानं त्याची भरपाई २ दिवस मोफत सेवा देऊन करण्यात येत आहे.

रिलायन्स जिओची ग्राहकांना २ दिवस मोफत सेवा
SHARES

देशभरात शनिवारी मुंबई, ठाणे परिसरातील रिलायन्स जिओच्या ग्राहकांना ८ तास इंटरनेट, मोबाईल सेवेपासून दूर रहावे लागले होते. रिलायन्सचे नेटवर्क ठप्प झाले होते. त्यामुळं रिलायन्स जिओनं मोठा निर्णय घेतला आहे. एका दिवसात ८ तास सेवा ठप्प झाल्यानं त्याची भरपाई २ दिवस मोफत सेवा देऊन करण्यात येत आहे. 

रिलायन्स जिओची ही २ दिवस फ्री सेवा Reliance Jio च्या त्याच ग्राहकांना मिळणार आहे, ज्यांना शनिवारी ८ तास त्रास सहन करावा लागला आहे. बाकी राज्यातील ग्राहकांना मोफत सेवा दिली जाणार नाही. याचा अर्थ ज्या लोकांना इंटरनेट आणि कॉलिंग सेवेचा लाभ घेण्यास समस्या आली त्यांना त्यांच्या व्हॅलिटिडीवर दोन दिवस वाढवून मिळणार आहेत.

जिओ युजर्सना कंपनीकडून याबाबत मेसेज आले आहेत. यामध्ये दोन दिवस वाढीव सेवा दिली जाणार असल्याचे म्हटले आहे. याआधी २०२१ मध्ये देखील जिओने ग्राहकांना दोन दिवसांची फ्री सेवा दिली होती. मात्र, हा फायदा केवळ प्रभावित झालेल्या युजर्सनाच मिळाला होता. दोन वर्षांत असे दुसऱ्यांदा घडले आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा