मुंबई युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवीधर भारतीय महिलेचा डुडलद्वारे सन्मान


SHARE

भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कार्नेलिया सोराबजी यांच्या 151 व्या जन्मदिनानिमित्ताने गुगलने एक खास डुडल तयार करत सलामी दिली आहे. कार्नेलिया या लंडन आणि ब्रिटिश युनिव्हर्सिटीतून कायद्याचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या.


सोराबजींचा नाशिकमध्ये आल्या जन्माला

कॉर्नेलिया सोराबजी यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1866 रोजी नाशिकमध्ये झाला. सोराबजी या एक समाज सुधारकच नाही तर एक लेखिका देखील होत्या. 1892 मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी त्या परदेशात गेल्या आणि 1894 मध्ये पुन्हा भारतात परतल्या.

महिला आणि शोषित वर्गासाठी त्यांनी संघर्षाची लढाई लढली, असे म्हटले जाते त्यांच्या रक्तातच स्त्रीत्व होते. त्यांच्या आईने पुण्यात मुली आणि महिलांना सशक्त, शिक्षित करण्यासाठी एक शाळा सुरू केली होती.


तरीही वकिली करण्याचे ठरवले

कॉर्नेलिया यांना पाच भावंडे होती. त्यावेळी महिलांना वकिली करण्याचा अधिकारच नव्हता. महिलांना त्या काळी घरातून बाहेरही पडू दिले जात नव्हते. पण कार्नेलिया यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी परदेशात कायद्याचे शिक्षण घेत भारतात परतल्या. त्यानंतर महिलांना कायदेशीर सल्ला देत त्यांच्यासाठी वकिली व्यवसाय सुरू करण्याची मागणी उचलून धरली.

1907 च्या नंतर कॉर्नेलिया यांनी बंगाल, बिहार, उडीसा आणि अासाम येथील न्यायालयात सहाय्यक महिला वकिलाचा पदभार सांभाळला. त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 1924 मध्ये महिलांना वकिली करण्यापासून रोखणारा कायदा रद्द करण्यात आला आणि महिलांनाही वकिली करण्याची परवानगी मिळाली.


कॉर्नेलिया यांचे 1954 मध्ये निधन

1929 मध्ये कॉर्नेलिया उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील म्हणून सेवानिवृत्त झाल्या. तोपर्यंत महिलांमध्येही जागरुकता निर्माण झाली होती. अनेक महिलांनी कायद्याच्या शिक्षणाला सुरुवात करत वकीली पेशा स्वीकारला. पण 6 जुलाई 1954 मध्ये कॉर्नेलिया यांचे लंडनमध्ये निधन झाले.


हेही वाचा - 

रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जींना गुगलची श्रद्धांजली


संबंधित विषय