Advertisement

मुलुंडच्या 'गोशाळे'तील विद्यार्थीनींनी जवानांना पाठवल्या राख्या


मुलुंडच्या 'गोशाळे'तील विद्यार्थीनींनी जवानांना पाठवल्या राख्या
SHARES

देशातील सव्वाशे कोटी नागरिक ज्यांच्यामुळे सुरक्षित आहेत, ते म्हणजे भारतीय जवान ! देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे.

हीच भावना थेट जवानांपर्यंत पोहोचवण्याकरिता मुलुंडमधील 'गोशाळा' या मुंबई महापालिकेच्या शाळेने गुरुवारी एक अनोखा उपक्रम राबवला. या शाळेतील गाईडच्या विद्यार्थीनींनी सीमेवरील सैनिकांसाठी राख्या बनवून त्या जवानांना पाठवल्या.



कशा बनवल्या राख्या, पाहा ट्विटरवर-  







देशासाठी आपल्या प्राणांचीही आहुती देणाऱ्या जवानांप्रती मुलांच्या मनात आस्था आणि देशाविषयी प्रेम निर्माण करणे हा या उपक्रमामागचा मूळ हेतू. हा उपक्रम भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही, असे या उपक्रमाच्या आयोजकांनी सांगितले.




या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर सुरेल गीतेही गायली. सद्यस्थित सीमेवरील भारत-चीन दरम्यान ताणलेले संबंध आणि पाकिस्तानकडून होणारे सततचे भेकड आतंकवादी हल्ले या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांना पाठवलेल्या या राख्या त्यांचे मनोधैर्य उंचावतील हे निश्चित.



हे देखील वाचा -

अारेत ७ दिवसांत 'त्यांनी' लावली १४०० झाडे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा