Advertisement

सिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव स्थगित


सिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव स्थगित
SHARES

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात वर्षातून ४ वेळा बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येतो. दरवर्षीनुसार यंदाही देवदिपावलीच्या मुहूर्तावर बाप्पा चरणी अर्पण करण्यात आलेल्या गणेशाच्या प्रतिमा, लाॅकेट्स, दुर्वा, अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, हार अशा अनेक वस्तू या लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात येणार होत्या. हा लिलाव रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत आयोजित करण्यात आला होता. याचसोबत लिलावासाठी उपलब्ध असलेले काही अलंकार सकाळी ९ वाजल्यापासून मंदिराच्या आवारात प्रदर्शनात ठेवण्यात येणार होते. पण काही तांत्रिक अडचणीमुळे रविवारी होणारा हा लिलाव रद्द करण्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने घेतला आहे.


लवकरच होणार लिलाव

सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव वर्षातून ४ वेळा शुभ मुहूर्त बघून केला जातो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने जपली आहे. बाप्पाचरणी अर्पण केलेले दागिने आशीर्वाद स्वरुपात आपल्याकडे असावेत यासाठी गणेश भक्त नेहमीच या लिलावाला गर्दी करतात. या लिलावाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा वापर सर्वसामान्य गरजू, रुग्ण, विद्यार्थी आणि शैक्षणिक कामासाठी मंदिर न्यास समिती देणगी स्वरुपात करते. 


हा लिलाव स्थगित केला असला तरीही लवकरच लिलावाची पुढची तारीख गणेश भक्तांना कळवण्यात येईल.

- संजीव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिद्धिविनायक न्यास

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा