Advertisement

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये महिला सरपंचही धावणार

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण 20 पंच सरपंच आणि नेतृत्वशील महिला धावणार आहेत.

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये महिला सरपंचही धावणार
SHARES

मुंबई येथे 15 जानेवारी 2023 रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) पार पडणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील विविध गावांतील ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

गाव विकास प्रशिक्षण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी झटणारी आरएससीडी आणि पायाभूत लोकशाही सक्षमीकरणासाठी (Grassroots Democracy Platform) प्रयत्न करणारी "ईशाद"(ISHAD) या स्वयंसेवी संस्थांच्या प्रोत्साहनातून महिला सरपंच धावणार आहेत.

राज्यभरात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या ज्यात कितीतरी गावात महिला सरपंच निवडून आल्या. ज्यामुळे विविध गावांच्या विकासात आता महिला नेतृत्वही आपल्यापरिने मोलाचे योगदान देणार आहेत.

यावेळी स्थानिक विकासकामे, गरजा आणि निधीचा पारदर्शी उपयोग, या सर्व कामांमध्ये महिला सरपंच असताना यातून एक विरंगुळा म्हणून त्या टाटा मुंबई मॅरेथॉन या भव्य स्पर्धेतही सहभागी होतील.

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण 20 पंच सरपंच आणि नेतृत्वशील महिला धावणार आहेत. सीमा पाचंगे, वर्षा मिडगुले ,प्रणया टेमकर, अर्जना पवार,शारदा गायधने , ऊमा माळी, अर्चना कांबळे,शर्मिला रामटेके,संगिता वेंदे ,अर्चना जतकर,रत्नमाला वैद्य, हर्षदा वाळके,मालती सगणे, सुनंदा मांदळे, सुरैय्या पठाण, नंदा गायकवाड, माया सोनागोती, समिना शेख, प्रज्ञा आवाडे आणि मयुरी लाड अशी या महिलांची नावे आहेत.



हेही वाचा

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेकडून 15 जानेवारीला 2 विशेष लोकल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा