Advertisement

एपीएमसी मार्केटमध्ये 12 सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण

वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये 12 सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने आता खासगी बॉडीगार्ड नेमले आहेत.

एपीएमसी मार्केटमध्ये 12 सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण
SHARES
Advertisement

वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये 12 सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने आता खासगी बॉडीगार्ड नेमले आहेत.

 एपीएमसी मार्केटमध्ये काम करणारे किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित 590 कोरोना रुग्ण आहेत. अशा कठीण परिस्थितीत एपीएमसीच्या नियमित 12 सुरक्षारक्षकांची चाचणीही पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारी न घेता थेट खासगी सुरक्षारक्षकांची निवड केली आहे. या खासगी सुरक्षारक्षकांना (बाऊन्सर) नियमित सुरक्षारक्षकांच्या पगाराच्या दुप्पट रक्कम देऊन त्यांना मार्केटमध्ये तैनात केले आहे.

खासगी बाऊन्सर तैनात करण्याबाबत एपीएमसीचे सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे म्हणाले, कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या आमच्या 12 सुरक्षकांव्यतिरिक्त, लॉकडाऊन कालावधीत गैरहजर राहिलेल्या 42 सुरक्षारक्षकांना प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे परत पाठविले आहे. त्यामुळे खासगी बाऊन्सर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.


हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय
संबंधित विषय
Advertisement