सलाम 'त्यांच्या' जिद्दीला

चेंबूर - खळखळून हसणारी मुलं कुणाला आवडत नाहीत? या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद निराळाच आहे आणि नाचणारी ही मुलंही स्पेशल आहेत. ही मुलं जणू काही अशाच संधीची वाट पाहत होते, जिथे त्यांना कौशल्य दाखवता येईल. या दिव्यांग मुलांना ही संधी मिळवून दिली, चेंबूरच्या नैसीओ या संस्थेनं. रोटरी क्लबच्या मदतीनं या संस्थेनं या मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात या मुलांमध्ये लपलेले कलाकार दिसले आणि कार्यक्रम पाहणारे थक्कच झाले. कलागुणांनी भरलेल्या या खास मुलांनी चित्रकला, रांगोळी, कशिदाकाम, तबलावादन तर केलंच, पण मराठी आणि हिंदी चित्रपट गाण्यांवर दिलखेचक नृत्यही करून दाखवलं. या खास मुलांकडे पाहिल्यावर पटतं की, जगात अशक्य असं काहीच नाही. त्यांचे कलागुण आणि जिद्दीलाही सलाम!

Loading Comments