बॉम्बे रिपब्लिकन्सचा वेस्टर्न रेल्वेवर ३-२ ने विजय


SHARE

मुंबई हॉकी असोसिएशन लीगच्या सुपर डिव्हिजन स्पर्धेत बॉम्बे रिपब्लिकन्सने अनुभवी वेस्टर्न रेल्वेवर 3-2 अशा फरकाने मात केली. ही स्पर्धा बुधवारी चर्चगेट येथील महिंद्रा स्टेडिअमवर रंगली होती.

रिपब्लिकनच्या दर्शन गावकरने २३ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पण रेल्वेच्या जय करणने २४ व्या आणि २६ व्या मिनिटाला गोल करत आक्रमक उत्तर दिले. त्यानंतर रिपब्लिकन संघाच्या देवेंद्र वाल्मिकीने ६८ व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

याआधी झालेल्या लढतीत इंडियन नेव्हीने ३-२ अशा फरकाने सेंट्रल रेल्वेवर मात करत सामन्यात विजयाचा झेंडा रोवला. या सामन्यात इंडियन नेव्हीच्या प्रतिक सिंह याने १७ व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवली. ३१ व्या मिनिटाला सेंट्रल रेल्वेच्या राजेंद्र पवार याने गोल करत बरोबरी साधली. पण नंतर नेव्हीच्या जुगराज सिंगने ६०, तर अमित गोस्वामी याने ६७ व्या मिनिटाला गोल करत संघाला ३-२ ने आघाडी मिळवून दिली. शेवटच्या मिनिटाला रेल्वेच्या विशाल पिल्ले याने ६८ व्या मिनिटाला गोल केला.हेही वाचा - 

हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबईचा दणदणीत विजय

हॉकी स्पर्धेत रेल्वेचा संघ अजिंक्यडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय