Advertisement

जिमखान्यातून हार्दिक पांड्याची हकालपट्टी

'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना अखेर चांगलंच महागात पडत आहे.

जिमखान्यातून हार्दिक पांड्याची हकालपट्टी
SHARES

'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना अखेर चांगलंच महागात पडत आहे. या दोघांवरही सोशल मिडीयासह सर्वच स्तरातून टीका होत आहे. इतकंच काय तर मुंबई पोलिसांनीही ट्वीटरच्या माध्यमातून या दोघांवर टीका केली आहे. असं असताना आता हार्दिक पंड्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण आता खार जिमखान्याकडून हार्दिक पांड्याचं मानद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. हार्दिक पांड्यांच्या आक्षेपार्ह विधानामुळं महिलांमध्ये नाराजी असून हा वक्तव्याचा निषेध म्हणून त्याचं मानद सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती खार जिमखान्याकडून देण्यात आली आहे.


कंपन्यांचे करार रद्द

कॉफी विथ करण या प्रसिद्ध शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के.जे.राहुल यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानं केली होती. त्यामुळं या दोघांनाही ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यांकरीता निलंबीत करून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांनंतर अनेक कंपन्यांनीही त्यांच्याशी असलेले संबंध करार रद्द केले आहेत.


सदस्यत्वावर आक्षेप

कंपन्यांशी असलेले करार रद्द झाल्यानंतर आता हार्दिक पांड्याला खार जिमखान्याचं मानद सदस्यत्वही गमवावं लागलं आहे. खार जिमखान्यानं हार्दिकला त्याचा खेळ आणि लोकप्रियता पाहून हे मानद सदस्यत्व दिलं होतं. पण त्याच्या वादग्रस्त विधानानंतर अनेक महिलांनी त्याच्या मानद सदस्यत्वावर आक्षेप घेतला. यामुळेच त्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय खार जिमखान्याकडून घेण्यात आला आहे.


कारवाईची मागणी

या प्रकरणी जिमखान्याच्या महिला सदस्यांनी जिमखान्याच्या ऑफिशल फेसबुक अकाउंटवर हार्दिक पांड्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. यावर जिमखान्याच्या मॅनेजींग कमिटीनं एकमतानं त्याचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच त्याला ३ वर्षांसाठी जिमखान्याचं सदस्यत्व दिले होते.हेही वाचा -

आता बारकोड स्कॅन करुन थेट विमानानं प्रवास करता येणार

मुंबईकर आणि पर्यटकांनसाठी माहिम चौपाटीचे होणार सुशोभिकरणRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा