Advertisement

शुभम घागरे, ओम रावल, मिहीर शेख अजिंक्य


शुभम घागरे, ओम रावल, मिहीर शेख अजिंक्य
SHARES

सुरेश आचरेकर कॅरम स्मृती चषक या शालेय मुलांच्या स्पर्धेत 16 वर्षांखालील गटात शुभम घागरेने कृष्णा पांडेचा 25-9, 25-0 अशा फरकाने पराभव करून अजिंक्यपद पटकावले. प्रमुख खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या कृष्णा पांडेवर शुभम घागरेने सहज विजय मिळवताना अप्रतिम खेळ केला.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडेमी आणि स्पोर्ट्स असोसिएशन फॉर इंडियन स्कूल चिल्ड्रेनतर्फे डॉ. अँटोनियो डिसिल्वा हायस्कूलच्या सहकार्याने झालेल्या 14 वर्षांखालील गटात ओम रावलने तर, 12 वर्षाखालील गटात मिहीर शेखने विजेतेपद पटकावले.

यावेळी कॅरम सम्राट सुहास कांबळी, मुख्याध्यापक सुसाना गोम्स, आयडियल स्पोर्ट्स अकॅडेमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, सल्लागार अनंत भालेकर, क्रीडापटू सचिन आयरे, डॉ. ओमप्रकाश जोशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्व्हा हायस्कूल सभागृहामधील कॅरम स्पर्धेच्या 14 वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत ओम रावलने साहिल पुंगीवर 25-13, 25-10 असा तर 12 वर्षांखालील अंतिम फेरीत मिहीर शेखने ओम नाईकवर 25-16, 25-14 अशा फरकाने मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.


..या विजेत्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान

16 वर्षाखालील गटात उपांत्य उपविजेते आर्य पवार, हरीश शिंटे आणि उपांत्यपूर्व उपविजेते सिद्धेश परब, हर्षवर्धन गुप्ता, मनन बिड आणि अनुज सुखदरे हे खेळाडू पुरस्कार विजेते ठरले.

14 वर्षाखालील उपांत्य उपविजेते अथर्व रसाळ, निखील तलाकोकुला आणि उपांत्यपूर्व विजेते वेदांत बागडे, महेश दोरमल, कैश बोर्जे, तन्मय कोळमकर या विजेत्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

12 वर्षाखालील उपांत्य उपविजेते मानव गायकवाड, मोहमद शेख आणि उपांत्यपूर्व उपविजेते सर्वेश कोडकुंडला, प्रणय मालव, राज यादव, आर्यन पटेल या खेळाडूंनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.



हेही वाचा -

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत संदीप दिवे, आयेशा मोहम्मद विजयी

लोअर परळचा 'चाळकरी' बनला आंतरराष्ट्रीय कॅरमपटू


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा