सुसाट वाहनांना 40 कॅमेरे लावणार ब्रेक

  Pali Hill
  सुसाट वाहनांना 40 कॅमेरे लावणार ब्रेक
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईच्या रस्त्यावरून नियम धाब्यावर ठेवून धावणाऱ्या वाहनांना आता एएनपीआर (अॅटोमॅटीक नंबर प्लेट रेक्गनेशन) कॅमेरे ब्रेक लावणार आहेत. सुसाट वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार मुंबई महानगरपालिकेने तीन मुख्य रस्त्यांवर 40 एएनपीआर कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांचे नंबर प्लेट कैद करणाऱ्या या कॅमेऱ्यामुळे बेदरकार गाडी चावणाऱ्यांना चाप बसणार आहे.

  मरिन ड्राईव्ह, पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या तीन ठिकाणी हे 40 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मे. अॅबमॅटीका टेक्नॉलॉजी कंपनीला यासाठीचे कंत्राट देण्यात आले असून यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. 2 कोटी 45 लाख 71 हजार रुपये खर्च यासाठी अपेक्षित आहे. या कॅमेऱ्यांमध्ये कैद होणाऱ्या सुसाट वाहनांच्या चालकांना ई-चलन पाठवत त्याला दणका दिला जाणार आहे हे विशेष.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.