Advertisement

मोकळ्या वेळेत करा वाचन, एअरटेल आणि जुगर्नाटवर वाचा मोफत पुस्तकं

एअरटलनं जाहीर केलं आहे की, त्यांच्या इ-बुक्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली बुक्स सर्व एअरटेल ग्राहकांसाठी विनामुल्य उपलब्ध असतील.

मोकळ्या वेळेत करा वाचन,  एअरटेल आणि जुगर्नाटवर वाचा मोफत पुस्तकं
SHARES

भारतात कोविड- १९ च्या वाढत्या घटनांमध्ये होणारी वाढ पाहता १४ एप्रिलपर्यंत सर्व लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात नागरिक केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकतात. केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं किंवा आवश्यक सेवा पुरवणारी दुकानंच चालू राहतील.

या काळात बरेच जण आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवणं पसंत करतात. तर काही जणांचा ऑनलाईन मालिका पाहण्याकडे जास्त कल दिसून येतो. एक असाही वर्ग आहे ज्याला वाचनाची आवड आहे. जो वेगवेगळी पुस्तकं वाचण्यावर जास्त भर देतोय. पण यातल्या बऱ्याच जणांना पुस्तकं वाचणाचटी आवड आहे. परंतु, वाचायला पुस्तकंच नाहीत. अशांसाठी एरटेल गी टेलिकॉम कंपनी पुढे आली आहे.

एअरटलनं जाहीर केलं आहे की, त्यांच्या इ-बुक्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली बुक्स सर्व एअरटेल ग्राहकांसाठी विनामुल्य उपलब्ध असतील.

कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे की, “भारत कोव्हीड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे. घरी राहत असलेले Android आणि IOS ग्राहक आता अ‍ॅप डाऊनलोड करून अनेक पुस्तकं आणि कादंबऱ्या विनामूल्य मिळवू शकतात".

  • सुधीर सीतापती यांची सीईओ फॅक्टरी (The CEO Factory)
  • कॅथरीन एबन यांची बॉटल ऑफ लाईज (Bottle of Lies)
  • टोनी जोसेफ यांची अर्ली इंडियन्स (Early Indians)
  • रजत गुप्ता यांची माईंड विदाऊट फियर (Mind Without Fear)
  • ट्विंकल खन्ना यांची पैजामा आर फॉरगिव्हींग (Pyjamas are Forgiving)
  • रुजुता दिवेकर यांची १२ विक फिटनेस प्रोजेक्ट (12 Week Fitness Project)
  • कोहिनूर यांची विल्यम ड्रामपल (William Dalrymple)
  • सौरव गांगुलीची सेनच्युरी ईज नॉट इनफ (Century is not Enough)
  • अभिजित बॅनर्जी आणि एस्तेर दुफलो यांची गुड इकनॉमीक्स (Good Economics)

भारती एअरटेलचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर आदर्श नायर म्हणतात, “अशा अभूतपूर्व काळात, एअरटेल आणि जुगर्नाट सामाजिक दुरावा ठेवून लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. महत्त्वाचं म्हणजे गुंतण्यासाठी वाचन चांगला पर्याय आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांसाठी नवीन पुस्तकं आणि नवीन कथा आणत आहोत.”

जुगर्नाट बुक्सचे सह-संस्थापक चिकी सरकार म्हणाले की, “बदलत्या भारतासाठी नवीन प्रकारचे वाचन आणि नवीन प्रकारचे वाचक आम्ही शोधत आहोत. कोरोनाव्हायरस आणि लॉकडाउनमध्ये जाणारे देश आणि लोक घरी अधिक वेळ घालवतात. म्हणूनच असं काहीतरी करण्याचं आम्हाला सुचलं.

जुगर्नाट बुक्स प्रेम आणि प्रणयरम्य, व्यवसाय, इतिहास आणि राजकारण, फिटनेस, आहार, अध्यात्म आणि अभिजात संगीत अशा अनेक शैलींमध्ये ई-पुस्तके आणि कादंबर्‍या ऑफर करत आहे. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी तुम्ही वाचन करू शकता.



हेही वाचा

डेटिंग अॅप डाऊनलोड वाढले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा