Coronavirus cases in Maharashtra: 240Mumbai: 97Pune: 33Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan-Dombivali: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

डेटिंग अॅप डाऊनलोड वाढले

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून आमच्या वेबसाईटवर लोक जास्त वेळ घालवत असल्याचा दावा ग्लीडेनने अहवालात केला आहे.

डेटिंग अॅप डाऊनलोड वाढले
SHARE

 कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अनेकजण घरीच आहेत. काहीजण घरूनच काम करत आहेत. तर काहींना घरून काम करण्याची सोय नसल्याने ते इंटरनेटच्या मदतीने वेळ घालवत आहेत. या प्रार्श्वभूमीवर विवाहबाह्य संबंधांसाठी लोकप्रिय असणार्‍या ग्लीडेन या डेटिंग अँॅप कंपनीने एक अहवाल जारी केला आहे. लोकं घरी रहायला लागल्यापासून आपल्या कंपनीचं डेटिंग अँप डाऊनलोड करणार्‍या भारतीयांची संख्या ७0 टक्क्यांनी वाढल्याचा दावा कंपनीने केला आहे.


 कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून आमच्या वेबसाईटवर लोक जास्त वेळ घालवत असल्याचा दावा ग्लीडेनने अहवालात केला आहे. ३१ मार्चपर्यंत भारतातील अनेक भागांमध्ये लॉकडाउन असल्याने आमच्या वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. ग्लीडेनने  अहवालात म्हटलं की, आमच्या साईटवर गप्पा मारण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच खासगी आणि पब्लिक या दोन्ही प्रकारांमध्ये फोटो अपलोड करण्याचेही प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले  आहे. २0१७ पासून भारतामध्ये ग्लीडेन सेवा पुरवत असून आठ लाख भारतीय आपल्या सेवेचा लाभ घेत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.


इटलीसारख्या देशामध्ये ४ मार्चपासून सरकारने निर्बंध लागू केल्याने लोकांना घरात थांबवा लागत आहे. इटलीमध्येही ग्लीडेनचा वापर वाढल्याचा दावा कंपनीने केला आहे. आमच्या वेबसाईटवर येणार्‍या युझर्सची संख्या ३00 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच इटलीमधील युझर्स सामान्यपणे सरासरी दोन तास आमच्या वेबसाईटवर असायचे आता हा वेळ तीन तासांपयर्ंत गेला आहे असंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून लोक नवीन लोकांना भेट आहेत. ज्यांच्याबरोबर याआधी कधीही संवाद साधला नाही अशा लोकांशी आमच्या माध्यमातून संवाद साधला जात आहे. फ्रान्स आणि स्पेनमध्ये मागील काही दिवसांपासून लॉकडाउनला सुरुवात झाली असून तेथेही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.हेही वाचा -

Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद

Coronavirus Updates: प्रभादेवीत 'त्या' महिलेला करोनाची लागण

संबंधित विषय
ताज्या बातम्या