आता शूजही अल्ट्रा‘स्मार्ट’

हल्लीचा जग हे स्मार्ट आहे असं म्हटलं जातं. स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच, स्मार्ट टिव्ही अशा अनेक ‘स्मार्ट’ वस्तू आज बाजारात उपलब्ध आहेत. अनेकांना त्याची क्रेझही आहे.

  • आता शूजही अल्ट्रा‘स्मार्ट’
  • आता शूजही अल्ट्रा‘स्मार्ट’
SHARE

हल्लीचा जग हे स्मार्ट आहे असं म्हटलं जातं. स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच, स्मार्ट टिव्ही अशा अनेक ‘स्मार्ट’ वस्तू आज बाजारात उपलब्ध आहेत. अनेकांना त्याची क्रेझही आहे. हेच हेरून आता श्योमी या चीनी कंपनीनं स्मार्ट शूजही बाजारात उतरवले आहेत. टेक्नॉलॉजी क्षेत्रात सततच काही ना काही नवं करणाऱ्या या कंपनीनं Mi Men’s Sports Shoes 2, Mi Sports Bluetooth Earphones आणि Mi 2-in-1 USB Cable (30cm) लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.


४ एप्रिलपासून भारतात याची विक्री सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच Mi Men’s Sports Shoes 2 ला क्राऊड फंडिंगसाठी मार्केटमध्ये उतरवण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त Mi Sports Bluetooth Earphones आणि Mi 2-in-1 USB Cable लवकरच बाजारात उतरवणार आहे. यापूर्वी शाओमीनं Mi स्पोर्ट्स ब्लूटूथ इयरफोन बेसिक आणि Mi 2-IN-1 USB Cable (100cm) ची १ हजार ४९९ आणि २४९ रूपयांमध्ये विक्री करण्यात येत आहे.


Mi Men’s Sports Shoes 2 ची भारतातील किंमत २ हजार ९९९ रूपयांपर्यंत असू शकते. ग्रे, ब्लॅक आणि ब्लू रंगांमध्ये हे शूज उपलब्ध असणार आहेत. तर Mi Sports Bluetooth Earphones आणि Mi 2-in-1 USB Cable (30cm) च्या किंमतीबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आली नाही. सध्या केवळ MI.COM या बेवसाईटवरूनच या उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे.   
 हेही वाचा -

इन्स्टाग्रामवर येणार ‘हे’ नवं फिचर

जाणून घ्या व्हॉट्सअॅपमध्ये आलंय कोणतं नवं फिचर ?संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ