इन्स्टाग्रामवर येणार ‘हे’ नवं फिचर

इन्स्टाग्राम, फेसबुक व्हॉट्सअप हे आजकालच्या तरूणाईसाठी अगदी जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. त्यातच यात येणारी नवी फीचर्स ही तरूणाईला नक्कीच भूरळ घालणारी आहेत.

  • इन्स्टाग्रामवर येणार ‘हे’ नवं फिचर
  • इन्स्टाग्रामवर येणार ‘हे’ नवं फिचर
  • इन्स्टाग्रामवर येणार ‘हे’ नवं फिचर
SHARE

इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप हे आजकालच्या तरूणाईसाठी अगदी जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. त्यामुळे या सोशल नेटवर्किंग साइट्सवर येणारे नवे फीचर्स तरूणाईला नेहमीच भुरळ घालतात. असंच एक नवं फिचर इन्स्टाग्रामनंही आणलंय. यूट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहताना आपण तो रिवाईंड म्हणजेच थोडा मागं नेऊनही पाहू शकतो. परंतु इन्स्टाग्रामवर ही सुविधा नव्हती. युजर्सना तो व्हिडिओ पूर्ण संपेपर्यंत वाट पहावी लागत होती. परंतु आता इन्स्टाग्राम यासाठी एक नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. ज्याच्या मदतीनं व्हिडिओ सुरू असतानाही तो मागे नेऊन पाहता येऊ शकतो. यासंदर्भात माहिती देणाऱ्या एका वेबसाईटनं याबद्दल माहिती दिली आहे.


इन्स्टाग्राम यासाठी व्हिडिओ सीक बारची चाचणी घेत असून व्हिडिओच्या सीक बारवर क्लीक करून तो व्हिडिओ मागं नेऊन पाहणं आता शक्य होणार आहे. परंतु हे नवं फिचर काही जणांच्या पचनी पडण्याची शक्यताही दिसत नाहीय. हे फीचर नसल्यामुळं अनेक युजर्स तो व्हिडिओ संपेपर्यंत त्यावर राहत होते. परंतु आता त्यांना व्हिडिओ मागे पुढे नेण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.


यापूर्वी इन्स्टाग्रामंही ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करून युजर्सना शॉपिंगचा पर्यायही उपलब्ध करून दिला होता. काही निवडक ब्रॅन्डच्या वस्तू इन्स्टाग्रावर खरेदी करण्याचा पर्याय देण्यात आला होता. यापूर्वी फेसबुकनंही अशा प्रकारचा पर्याय युजर्ससाठी उपलब्ध केला होता. इन्स्टाग्राम हा फेसबुकचाच भाग असल्यामुळं आता त्या माध्यमातूनही शॉपिंग करणं सोपं झालं आहे.


तसंच इन्स्टाग्रामनं युजर्ससाठी आणखी एक नवं फिचर आणलं आहे. या नव्या फिचरला सेन्सिटीव्ह स्क्रीन असं नाव देण्यात आलं आहे. यामुळं अश्लिल फोटो किंवा, व्हिडिओ ब्लर दिसणार आहेत. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार हे फिचर सध्या भारतातील युजर्ससाठीच देण्यात आलं आहे.
हेही वाचा -

जाणून घ्या व्हॉट्सअॅपमध्ये आलंय कोणतं नवं फिचर ?
संबंधित विषय
ताज्या बातम्या