Advertisement

असं चालतं 'बेस्ट'चं अॅप ...!


असं चालतं 'बेस्ट'चं अॅप ...!
SHARES
Advertisement

मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या ओला-उबर या टॅक्सीची माहिती आपल्याला मोबाईलमध्ये एका क्लिकवर उपलब्ध होते. ओला-उबर टॅक्सीचं निश्चित स्थळ या अॅपमध्ये पाहायला मिळतं. या टॅक्सीबाबत कोणतीही माहिती सोशल मीडियावर सहज उपलब्ध होते. परंतु, मुंबईची दुसरी लाइफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाचं कोणतही अॅप अथवा सोशल प्लॅटफॉर्म नव्हतं. मात्र, बेस्ट आता आपली ओळख सोशल मीडियावर बनवत आहे.

बेस्टनं नुकताच आपलं अॅप सोशल मीडियावर लॉंच केलं आहे. ‘BEST प्रवास' असं या अॅपचं नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना बसचं स्थान आणि निश्चित वेळ समजण्यात मदत होणार आहे. एम इंडिकेटर (M-Indicator) अॅपमुळं जशी रेल्वेच्या वेळापत्रकाची इत्यंभुत माहिती आपल्याला मिळते. त्याचप्रकारे बसची माहिती या अॅपद्वारे मिळणार आहे.

या अॅपमुळे आता बेस्टचा प्रवास आणखीन सुखकर होईल असेही त्यांनी म्हटलं आहे. ट्रॅफिक मुळे किंवा रस्त्यांवरील इतर कामांमुळं अनेकदा आपली बस कुठपर्यंत पोहोचली आहे याचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळं अनेकदा आपली निश्चित बस चुकते आणि तासनतास एखाद्या मर्यादित बसची आपल्याला प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळं आपल्याला ज्या बसमधून प्रवास करायचा आहे, त्याची इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहचावी यासाठी प्रशासनानं काही तरी करावं अशी अनेक बस प्रवाशांची गेले कित्येक दिवसांपासूनची मागणी होत होती.

प्रवाशांच्या या मागणीला लक्षात घेत बेस्ट प्रशासनानं अॅपची सुविधा सुरु केली आहे. पाहूयात मग या अॅपमध्ये काय आहे? आणि या वापर कसा करायचा?


'BEST प्रवास' अॅप


नियोजन करा 

१. गंतव्यस्थान


'BEST प्रवास' हा अॅप ओपन केल्यावर आपल्याला 'गंतव्यस्थान' असा पर्याय येतो. या पर्यायाच्या माध्यमातून प्रवासी कुठून-कुठपर्यंत प्रवास करायचा आहे. याबाबत माहिती मिळणार आहे. 


२. मार्ग


'मार्ग' या पर्यायाच्या माध्यमातून प्रवाशांना बसचा नंबर टाकल्यास संबधित बसचा मार्ग समजण्यात मदत होणार आहे.


अलीकडील शोध

'अलीकडील शोध' या पर्यायाच्या माध्यमातून प्रवाशांना बसचं वेळापत्रक आणि किती वेळात पोहोचणार याबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.


शोध

'शोध' या पर्यायाच्या माध्यमातून प्रवाशांना बस थांब्यांची माहिती मिळणार आहे. तसंच, या पर्यायामध्ये जवळपासचे ६ बस थांबे दर्शविण्यात येतात. 


अनुकूल प्रवासमार्ग

'अनुकूल प्रवासमार्ग' या पर्यायाच्या माध्यमातून प्रवाशांना बेस्ट प्रवासाबाबत सर्व माहिती मिळणार आहे.


वेळापत्रक

'वेळापत्रक' या पर्यायाच्या माध्यमातून प्रवाशांना बसचं वेळापत्रक समजण्यात मदत होणार आहे. कोणती बस किती वाजता सुटणार याबाबत माहिती उपलब्ध होणार आहे. 


गहाळ वस्तू

'गहाळ वस्तू' या पर्यायाच्या माध्यमातून प्रवाशांना बसमध्ये हरवलेली वस्तू शोधण्यास मदत होणार आहे. एखादी आपली महत्वाती अथवा मौल्यवान वस्तू बसमध्ये राहिली असेल तर, या गहाळ वस्तू पर्यायामध्ये संबंधित वस्तूबाबत माहिती भरल्यास ती शोधण्यास मदत होणार आहे.  


अभिप्राय

'अभिप्राय' या पर्यायाच्या माध्यमातून प्रवाशांना आपलं मत नोंदवायचं आहे. त्यासाठी नाव, मोबाइल नंबर, बसचा नंबर, तारीख, वेळ आणि आपलं मत नोंदवायचं आहे. 


संपर्क 

'संपर्क' या पर्यायाच्या माध्यमातून प्रवाशांना बेस्ट प्रशासनाशी कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधता येणार आहे. हेही वाचा -

आरेच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेला पाठिंबा

'अराररारा' हा कलाकार पुन्हा दिसणार 'खतरनाक' भूमिकेत


संबंधित विषय