Advertisement

खोटे मेसेज रोखण्यासाठी व्हॉट्सॲपची 'आयडियाची कल्पना'

खोटी माहिती असणारे मेसेज देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरत आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲपनं उचललं हे महत्त्वाचं पाऊल....

खोटे मेसेज रोखण्यासाठी व्हॉट्सॲपची 'आयडियाची कल्पना'
SHARES

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसचे नाव जरी उच्चारले तरी लोक घाबरत आहेत. पण अशा परिस्थितीही लोकं व्हॉट्सॲपवरील मेसेज फॉरवर्ड करत आहेत. यामुळे अधिक भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. खोटी माहिती असणारे मेसेज देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरत आहेत. त्यामुळे आता इंस्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपनं आपल्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

व्हॉट्सॲपनं फॉरवर्ड करण्यात आलेल्या मेसेजबद्दल लिमिट निश्चित केली आहे. जे मेसेज अनेकवेळा फॉरवर्ड करण्यात आलेले आहेत, ते मेसेज आता केवळ एकदाच कोणालाही फॉरवर्ड करता येणार आहे. अनेकदा फॉरवर्ड केलेल्या मेसेज म्हणजेच यापुर्वी जो मेसेज ५ पेक्षा अधिकवेळा फॉरवर्ड करण्यात आलेला आहे. हे नवीन नियम जगभरात लागू होतील.

लॉकडाऊनमुळे व्हॉट्सॲप फॉरवर्डचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. नवीन नियमांनुसार अनेकवेळा पाठवण्यात आलेला मेसेज एकाच व्यक्तीला पाठवता येईल. मात्र असे असले तरी युजर्स मेसेज कॉपी करून चॅट बॉक्समध्ये पेस्ट करून पाठवू शकतात. यामुळे काही प्रमाणात फेक न्यूज रोखण्यास मदत मिळेल.

व्हॉट्सॲपनं मागील वर्षी फॉरवर्ड करण्यात आलेल्या मेसेजसाठी लेबल लावण्यास सुरूवात केली होती, ज्याद्वा युजर्सला आधीच फॉरवर्ड मेसेजची माहिती मिळते. याशिवाय, रिपोर्टनुसार युजर्स फॉरवर्ड मेसेजला ऑनलाईन सर्च करून सत्यता पडताळू शकतात, अशा फीचरचे व्हॉट्सॲप टेस्टिंग करत आहे.



हेही वाचा

व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटस लिमिटमध्ये बदल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाकवच अॅप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा