लॉकडाऊनच्या काळात घरात बंद असलेले लोक एकमेंकाशी संवाद साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात व्हॉट्सअॅपनं आपल्या एका महत्त्वाच्या फीचरमध्ये मोठा बदल केला आहे.
व्हॉट्सअॅपनं आपल्या स्टेट्सच्या टायमिंगमध्ये बदल केला आहे. युजर्स पुर्वी स्टेट्समध्ये ३० सेंकदांचा व्हिडीओ टाकू शकत होते. मात्र आता युजर्सला केवळ १५ सेंकदांचा व्हिडीओ टाकता येणार आहे.
ANNOUNCEMENT:
— WABetaInfo (@WABetaInfo) March 28, 2020
You can no longer send videos to WhatsApp Status if they are longer than 16 seconds: only videos having a duration of 15 seconds will be allowed.
This is happening in India and it's probably an initiative to reduce the traffic on the server infrastructures.
व्हॉट्सअॅपचे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत. दररोज स्टेट्स अपडेट करतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याच कारणामुळे लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर कमी करण्यासाठी व्हॉट्सअॅपनं स्टेट्सची वेळ कमी करून १५ सेंकद केली आहे. हा बदल भारतात करण्यात आला असून, यामुळे सर्व्हरवरील दबाव कमी होईल.
याआधी फेसबुक, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारख्या सेवांनी देखील आपल्या एचडी व्हिडीओची कॉलेटी कमी करून एसडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा