Advertisement

PUBG ला टक्कर द्यायला येणार FAU-G, 'ही' आहे लाँचिंगची तारीख

केंद्र सरकारने भारतात पबजी या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह ११८ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. त्यामुळे तरुणांचा चांगलाच हिरमोड झाला होता. आता पबजीला पर्याय म्हणून FAU-G गेम लाँच केला जाणार आहे.

PUBG ला टक्कर द्यायला येणार FAU-G, 'ही' आहे लाँचिंगची तारीख
SHARES

लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत क्रेझ असलेला पबजी (PUBG) हा गेम जगभरात प्रचंड लोकप्रिय झाल होता. मात्र, केंद्र सरकारने भारतात पबजी या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह ११८ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. त्यामुळे तरुणांचा चांगलाच हिरमोड झाला होता. आता पबजीला पर्याय म्हणून FAU-G गेम लाँच केला जाणार आहे.

चार महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने FAU-G गेम लाँच होणार असल्याची घोषणा केली होती. या गेमची प्रतिक्षा संपली असून प्रजासत्ताक दिनी हा मेड इन इंडिया गेम भारतात लॉन्च होणार असल्याची माहिती अक्षय कुमारने ट्विटरद्वारे दिली आहे. यासोबत गेमसाठी प्री-रजिस्टर लिंकदेखील त्याने शेअर केली आहे. या लिंकवर जाऊन युजर्स गेमसाठी रजिस्टर करू शकतात.

नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात हा गेम गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन दिला होता. या गेमच्या रजिस्ट्रेशनला फार मोठा प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या २४ तासांमध्येच या गेमने १० लाख प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा पार केला होता. प्री-रजिस्टर करणाऱ्या प्लेयर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल. त्यानंतर युजर्सना गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करता येईल. 

गेमच्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं. पण, आता नव्या टिझरवरुन पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल असं दिसतं. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल. धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.हेही वाचा -

दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपातRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा