Advertisement

आख्खं गिरगाव आता आलं मोबाईल अॅपवर!


आख्खं गिरगाव आता आलं मोबाईल अॅपवर!
SHARES

मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून ओळखले जात असले, तरी गिरगावचे नाव घेताच डोळ्यापुढे उभे राहते मराठमोळ्या संस्कृतीचे देखणे रुप. अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा गुढीपाडवा, ढोलताशा पथक, दहिहंडी उत्सव, गणेशोत्सवादरम्यान चौपाटीच्या दिशेने उसळणारी भाविकांची गर्दी समस्त मुंबईकरांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत.


मात्र, गिरगाव म्हणजे केवळ मराठमोळे उत्सवच नाहीत, तर इथल्या प्रत्येक गल्लीबोळाला स्वतंत्र ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या परिसरातील प्राचीन मंदिरे, वाड्या, रस्ते, त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहाेचविण्यासाठी काही तरुण गिरगावकरांनी पुढाकार घेत एक अॅप तयार केले आहे. या अॅपचे लोकार्पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आले.

सध्या दक्षिण मुंबईत 'आमची ड्राईव्ह' या अॅपचा जोरदार वापर सुरू असून गिरगावकरांच्या या नव्या अॅपलाही चांगला प्रतिसाद मिळेल, असे बोलले जात आहे. 



अनेकदा आपल्याला जगात काय घडते हे माहीत असते. पण, आपल्या परिसरात काय घडते याचा अंदाज नसतो. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी घटना मांडू शकत नाहीत. मात्र या घटना त्या-त्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.


- सुदीप नाईक, गिरगावकर



या अॅपच्या माध्यमातून गिरगावच्या इतिहासासोबतच परिसरात घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांची माहितीदेखील मिळणार आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून सहा जणांची टीम गिरगावमधील छोट्या-मोठ्या गोष्टींचा वेध घेण्यासाठी धडपडत आहे. या टीममधील समस्यांनी अथक मेहनतीने गिरगावमधील जास्तीत जास्त माहिती संकलित केली असून त्यात दिवसागणिक नवीन माहितीची भर टाकली जात आहे.



काय अाहे या अॅपमध्ये?

  • गिरगावमधील नागरी सुविधा
  • सांस्कृतिक घडामोडी
  • साहित्य संघातील प्रयोग
  • विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती
  • हॉटेल संस्कृती
  • ऐतिहासिक स्थळे, वास्तू
  • 2 किमी परिसरातील बातम्या

हे अॅप सध्या इंग्रजी भाषेत तयार करण्यात आले असले, तरी लवकरच त्यावर मराठी आणि हिंदी लेख, माहितीही उपलब्ध होणार आहे.


अधिक माहितीसाठी या फेसबुक पेजला भेट द्या - 

https://www.facebook.com/sudeepdilipnaik/about?lst=100000242127802%3A530141990%3A1499163544


हे देखील वाचा -

'आमची ड्राइव्ह' दक्षिण मुंबईत सुसाट


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा