'आमची ड्राईव्ह' मोबाईलच्या एका क्लिकवर

Mumbai
'आमची ड्राईव्ह' मोबाईलच्या एका क्लिकवर
'आमची ड्राईव्ह' मोबाईलच्या एका क्लिकवर
'आमची ड्राईव्ह' मोबाईलच्या एका क्लिकवर
'आमची ड्राईव्ह' मोबाईलच्या एका क्लिकवर
'आमची ड्राईव्ह' मोबाईलच्या एका क्लिकवर
See all
मुंबई  -  

मुंबईत 100 वर्षांपासून रस्त्यावर धावणारी काळी पिवळी टॅक्सी आता हायटेक झाली आहे. कारण ओला आणि उबर या टॅक्सीप्रमाणेच काळ्या पिवळ्या टॅक्सींसाठीचे मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे.


आता तुम्ही घर बसल्या एका मोबाईलच्या एका क्लिकवरून कुठेही जाण्यासाठी या टॅक्सीचे बुकिंग करू शकता. काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी खास तयार करण्यात आलेल्या या अॅपचे लॉन्चिग गुरुवारी संध्याकाळपर्यंत होणार आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रवाशांना 5 रुपये सेवा कर द्यावे लागतील तर, टॅक्सीचालकांना मोफत असेल.प्रवासी भाडे

बिगर वातानुकूलित टॅक्सीसाठी प्रति किलोमीटर 14 ते 15 रुपये
वातानुकूलित टॅक्सीसाठी प्रति किलोमीटर 16 रुपयेकशी झाली या मोबाईल अॅपची निर्मिती?

ओला उबेरच्या गारेगार सेवा येण्यापूर्वी काळी-पिवळी टॅक्सी अनेकांचा आधार होती. मात्र काळया-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या मनमानी कारभारामुळे त्रासलेल्या प्रवाशांनी खासगी ओला उबेरला पसंती दिली. 

त्यामुळे काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर संक्रात आली होती. आपला धंदा टिकवण्यासाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने बंगळुरूला स्थित 'सन टेलिमॅटिक्स' या कंपनीच्या मदतीने 'आमची ड्राईव्ह' या मोबाईल अॅपची निर्मिती केली.समिताचा अहवाल लांबणीवर पडल्याने उद्घाटनाला उशीर

खटुआ समितीचा अहवाल लांबणीवर पडल्याने या अॅपच उद्घाटन देखील लांबणीवर पडले होते. मात्र आता त्या अहवालाची प्रतीक्षा न करता मुंबई टॅक्सी मेन्स युनियने या अॅपचे उद्घाटन करणार आहे.


मोबाईल अॅपचे लॉन्चिग होण्यापूर्वी 3 हजार टॅक्सीचालकांना या अॅपचे प्रशिक्षण दिले आहे. खटुआ समितीच्या अहवालाला विलंब होत असल्यामुळे अॅप्लिकेशनवर जुनेच दर ठेवण्यात आले आहे.
- ए. एल. क्वॉड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सी मेन्स युनियनहे देखील वाचा -  

आता मुंबईकरांसाठी ओलाची 'एसी' बस, बेस्टचं काय होणार?

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीच्या ऑनलाईन सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.